
वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य वुशू स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत तिसरा क्रमांक पटकावला. मुंबई जिह्यातील चार खेळाडूंनी सुवर्ण, तीन खेळाडूंनी रौप्य व दोन खेळाडूंनी कास्य पदकांवर मोहोर उमटवली. वर्धा येथे झालेल्या स्पर्धेत 16 जिह्यांतील जवळपास 300 खेळाडूंनी सहभाग घेतला.
मुंबई जिह्याच्या प्रथमेश शेट्टीने 70 किलो वजनी गटात, साहील भंडारीने 45 किलो वजनी गटात, सायली भंडारीने 45 किलो वजनी गटात, प्रार्थना वर्माने 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदकांवर मोहोर उमटवली. विजेत्या खेळाडूंना संदीप शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.



























































