
देशातील सर्वात वेगवान ट्रेन अशी ओळख असलेली वंदे भारत ट्रेन सध्या वेगवेगळय़ा 43 मार्गांवर धावत असून मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात चार गाडय़ा धावत आहेत. त्यानंतर रेल्वे बोर्डाने आणखी सहा वंदे भारत ट्रेन वेगवेगळय़ा मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी दोन गाडय़ा मध्य रेल्वेला मिळणार आहेत. त्यामुळे त्या महाराष्ट्रातच धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात धावणाऱया वंदे भारत ट्रेनची संख्या सहावर जाणार आहे. वाऱयाचा वेग आणि आरामदायी प्रवासामुळे वंदे भारत ट्रेन अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. देशात धावणाऱया वंदे भारत ट्रेनच्या भारमानाचा विचार करता महाराष्ट्रात धावणाऱया वंदे भारत ट्रेनचे सरासरी भारमान 80-110 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे रेल्वेला मोठा महसूल मिळत आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने देशात आणखी सहा वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी दोन गाडय़ा मध्य रेल्वेला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी दोन मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे निश्चित झाले आहे.
श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, तेरापंथ युवक परिषद, श्री जैन तेरापंथ ट्रस्ट, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला येथे सोमवारी महाश्रमण समवसरण आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवचनकार युगप्रधान आचार्य श्रीमहाश्रमणजी यांचे आशीर्वाद घेतले. या सोहळय़ासाठी मोठय़ा संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.



























































