महाशिवरात्रीनिमित्त पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

620

महाशिवरात्रीनिमित्त आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. हर हर महादेव, बम बम भोले, जयघोषात मंदिर परिसर शिवमय झाला होता.

मंदिरामध्ये मध्यरात्री 12 वाजता महाशिवाभिषेक सोहळा पार पडला. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांवी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील पुरातन कालीन पिंपळेश्वर महादेव मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून मंदिरात परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दहा क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाचे वाटप देखील येथे सुरू आहे.

मंदिर परिसरात सभामंडप, पथदिवे, फिरण्यासाठी ग्राऊंड, लहान मुलांसाठी खेळणी आदी विकास कामे झाली आहे. मंदिर निर्सगरम्य परिसरात असून मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. मुर्शदपूर येथील बेलेश्वर महादेव मंदिर, कडा येथील महेश मंदिर, मांडवा गावातील मांडवेश्वर महादेव मंदिर याही मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या