हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची बैठक, नागपूर अधिवेशनावर झाली चर्चा

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या बैठकीला आज सुरुवात झाली. या बैठकीत काँग्रेसच्या बाजूने विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अभिजित वंजारी आणि प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. राज्यातील आगामी राजकीय रणनीती, संसदीय कामकाज आणि पक्षांच्या भूमिका यावर चर्चा झाली.

बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि अनिल परब उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी उपस्थिती लावली.