रत्नागिरी नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा सत्ताधारी महायुतीला विसर, इमारतीवर साधी रोषणाई नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगरपरिषदेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विसर पडला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या इमारतीवर साधी रोषणाईही करण्यात आली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

1 एप्रिल 1876 मध्ये ब्रिटिशांनी नगरपरिषदेची स्थापना केली. आज रत्नागिरी नगरपरिषदेला दीडशे वर्ष पूर्ण झाली. मात्र सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा विसर पडल्याचे दिसत आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात सत्तेवर आलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या उपक्रमांची घोषणा करायला हवी होती. नगरपरिषदेच्या इमारतीला रोषणाई करणे आवश्यक होते. मात्र सत्ताधारी मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन दीडशे वर्षानिमित्त शहर प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

दरम्यान, राजापूर नगरपरिषदेलाही आज दीडशे वर्ष पूर्ण झाली. राजापूर नगरपरिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडीने आठवणीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि राजापूर नगरपरिषद इमारतीला रोषणाई करत विविध उपक्रम राबविले आहेत.