पाठदुखी वाढली तर विश्रांती घ्यावीच लागेल; धोनीचे फिटनेसवर लक्ष

सामना ऑनलाईन । चेन्नई

पाठीच्या दुखापतीने मी थोडा त्रस्त आहे. मात्र, चिंता करण्यासारखे कारण नाही, मात्र विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता तोंडावर आली आहे. त्यामुळे सध्या मी फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे. पाठदुखी वाढली तर नक्कीच मी काही ‘आयपीएल’ सामन्यातून विश्रांती घेईन, अशी माहिती चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली.

…तर मला फ्रेंचाइजी विकतच घेणार नाही!

‘आयपीएल’मध्ये तुमचा चेन्नई सुपरकिंग्ज नेहमीच प्ले ऑफमध्ये कसा पोहोचतो असे विचारले असता धोनीने मोठे गमतीशीर उत्तर दिले. ‘ते गुपित मी निवृत्त झाल्यानंतर सांगेन. आताच ते गुपित सांगितले तर मला माझी फ्रेंचाइजी पुन्हा विकत घेणार नाही. त्यामुळे त्या गुपितासाठी तुम्हाला निवृत्तीपर्यंत वाट बघावी लागेल, असे धोनीने हसत हसत सांगितले.