
आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू व्हायला काही तास उरलेले अशतानाच चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून एक चिंतेची बातमी समोर आली आहे. CSK चा स्टार महेंद्रसिंह धोनी याच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे धोनी पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांना मुकणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत x अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
“धोनी सध्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यात उपलब्ध नसेल.” धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन सांभाळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्सने नुकतेच संघात सामील केले आहे.
आजचा सामना: आयपीएल २०२६ चा धमाका सुरू
आजपासून आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा बिगुल वाजणार आहे. आजचा पहिला सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.
सामना: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH)
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू






























































