
आयपीएल 2026 च्या हंगामात वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला. या लढतीत मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल माहिका शर्मा, हार्दिकचा मुलगा अगस्त्य त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. यावेळी मैदानातील खेळाप्रमाणेच मैदानाबाहेर घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माहिका हार्दिकचा मुलगा अगस्त्यची काळजी घेताना दिसतेय. सामना संपल्यानंतर माहिका अगस्त्यचा हात धरून स्टेडियमबाहेर जात असताना तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी (पपाराझी) त्यांना घेरले. कॅमेऱ्यांच्या फ्लॅश लाईट्समुळे अगस्त्यला त्रास होत असल्याचे माहिकाच्या लक्षात आले. हे पाहून ती प्रचंड संतापली आणि तिने फोटोग्राफर्सना कडक शब्दांत सुनावले.
Hardik Pandya’s girlfriend Mahaika Sharma is taking care of Hardik’s son just like a real mother after the match. When the media flashes were hitting the child’s eyes, she asked them to stop the flash and said, “No light please,” while protecting his eyes. pic.twitter.com/NDzY0OYmsU
— ⁴⁵ (@rushiii_12) March 29, 2026
माहिकाने अगस्त्यचे संरक्षण करत फोटोग्राफर्सना रस्ता देण्याची विनंती केली. ती म्हणाली, “कृपया थोडा बाजूला व्हा, मी अगस्त्यसोबत आहे. सर, प्लीज फ्लॅश लाईट बंद करा, त्याला त्रास होत असल्याचे त्यांना सागितले. यानंतर तिने अगस्त्यला तो ठीक आहे ना, असेही विचारले. यावेळी महिकाने ज्या प्रकारे अगस्त्यची काळजी घेतली, त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला असून ते दोघे मिळून अगस्त्यचा सांभाळ करत आहेत. हार्दिकने 2025 मध्ये माहिका शर्मासोबतच्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून माहिका अनेकदा हार्दिकच्या सामन्यांना उपस्थित राहून अगस्त्यसोबत वेळ घालवताना दिसते.


























































