माहीम येथे मारहाणीत तरुणाचा मृत्यू, पाच जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका तरुणीसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर सहा जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माहीम येथे घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे, तर सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे.

आज पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास माहीमच्या रहेजा इस्पितळ परिसरात ही हत्येची घटना घडली. साहिल खान (23) असे मृत तरुणाचे नाव असून तो कॅटरिंगचे काम करतो. त्याची यास्मिन नावाच्या तरुणीसोबत शाब्दिक बाचाबाची झाली होती. तेव्हा तिने इतरांना बोलावून घेतले. त्यानंतर सहा जणांनी मिळून साहिलला बेदम मारहाण केली.