
श्री रेणुकादेवी संस्थान माहूरगड निर्मित आणि संतकवी विष्णुदास रचित ‘माहूर गडाची माय रेणुका’ या ध्वनिफितीचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले. संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या ही 21 पदांची स्वरमाला असून मंगेश बोरगावकर, सागर जाधव, आदित्य कडतने, योगेश कदम, शेफाली कुलकर्णी, वर्षा जोशी, स्वराली जाधव आणि मुक्ता जोशी यांनी गायली आहे.
श्री रेणुका देवी संस्थान माहूरगडचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य होऊच शकले नसते, असे आनंदी विकास म्हणाल्या. या पदांचे सर्व काम मीडिया वर्क्स स्टुडिओ, पुणे येथे करण्यात आले आहे. संगीत संयोजन प्रथमेश कानडे यांचे असून तांत्रिक बाजू आदित्य विकास आणि प्रसाद पवार यांनी सांभाळली आहे. यावेळी माहूरचे तहसीलदार अरविंद जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कन्नव, विकास देशमुख, व्यंकट मुळजकर, आदित्य देशमुख, भार्गवी देशमुख आणि अनंत कुलकर्णी हे उपस्थित होते.

























































