माहूर गडावरील आई रेणुकेचा चैत्र नवरात्र उत्सव भाविकांविना संपन्न

325

माहुर गडावरी… गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास… साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर श्री रेणुकादेवी संस्थान च्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव सोहळा 25 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात आला मात्र पहिल्यांदाच इतिहासात हा सोहळा भाविकांविना पार पडला आहे.

कोरोना व्हायरसचे संकट देशावर आले आहे. यामुळे सरकारने या संकटाशी लढा देण्यासाठी कडक धोरण अवलंबवीली आहेत. या धोरणाचा भाग म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहून माहूर गडावरील श्री रेणुकादेवी मंदिर बंद करण्यात आले असले तरी श्री रेणुका मातेचे नित्योपचार सुरू आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्याने मंदिर प्रशासनास वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत मंदिर बंदचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व अनेक भावीक भक्तांचे कुलदैवत असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शनास व चैत्र नवरात्र उत्सवाच्या सोहळ्यासाठी भाविक भक्तांना येता आले नाही. दरवषी चैत्र नवरात्र उत्सव भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून दिसत होता मात्र या वर्षी कोरोना व्हायरस मुळे माहूरगड परिसर मंदिर परिसर व शहरातील प्रमुख रस्ते मोकळे असल्याचे दिसून आले. असे असले तरी चैत्र नवरात्रात श्री रेणुका माता मंदिर प्रशासनाने होमहवन करून मातेस फुलांची आरास करण्यात होती.चैत्र नवरात्र उत्सवात पुजाऱ्याच्या हस्ते नियमित विधिवत पूजा शोषल डिस्टनस चे नियम पाळून करण्यात आली.त्यामुळे मातेचा गाभारा आकर्षक दिसत होता.

व्यापार्‍यावर उपासमारीची वेळ

माहूरातील बरेच नागरिक यात्रा,उत्सव कालावधीत व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु मागील पंधरा दिवसापासून श्री रेणुकादेवी मंदिर बंद आहे. तसेच चैत्र नवरात्र यात्रा उत्सवही भाविका बिना पार पडला आहे.कोरोना मुळे शहरातील व मंदिर परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना दुकाने बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

माहूर गडावर नेहमीच भक्ताची गर्दी असते.आज पर्यंत च्या इतिहासात कधी मंदिर बंद ठेवण्यात आले नाही.परंतु कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने प्रशासनातील वरिष्ठांच्या आदेशाने श्री रेणुकादेवी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

– चंद्रकांत भोपी गुरुजी, विश्वस्त

आपली प्रतिक्रिया द्या