
सामना ऑनलाईन । श्रीगंगानगर
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये ट्रॅक्टर स्पर्धेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात १७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यातील ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्पर्धा बघण्यासाठी काही लोक पत्र्याच्या छपरावर उभे होते.तेव्हा अचानक छप्पर कोसळून हा अपघात घडला. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वसुधंरा राजे यांनी दिले आहेत. ही स्पर्धा बघण्यासाठी सुमारे १० हजार लोक जमले होते. या स्पर्धा पुर्वी पंजाबमध्ये घेण्यात येत होत्या. मात्र, तेथे या स्पर्धांवर बंदी घातल्यानंतर राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत होती. मात्र, या स्पर्धेला परवानगी देण्यात आली नव्हती, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#WATCH: Tin shed collapses during a tractor race in Sri Ganganagar’s Padampur earlier today. Many feared injured. #Rajasthan pic.twitter.com/rel9ChXhnD
— ANI (@ANI) July 29, 2018
पदमपूरमधील धानमंडीत ट्रॅक्टरची स्पर्धा चालू होती, या वेळी हजारोंच्या संख्येत प्रेक्षकवर्ग उपस्थित होते. एका पत्राच्या छपरावर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक स्पर्धा पाहत होते. पण अचानक हे छप्पर कोसळल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर मोठी धावपळ झाली.
























































