दिल्लीत पुन्हा अग्नितांडव, 9 जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील किरारा भागात एका इमारतीला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली होती. इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या कपड्याच्या गोदामाला ही आग लागली होती. अद्याप आगीचे कारण स्पष्ट नसून पोलीस तपास करत आहेत.

गेल्या दोन आठवड्यातील दिल्लीतील ही आगीची दुसरी मोठी घटना आहे. याआधी 8 डिसेंबरला उत्तर दिल्लीतील अनाज मंडीला लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते.