
सर्वसमावेशक शहर विकसित व्हावे, तरुणांना एकमेकांकडून माहितीचे आदान प्रदान करता यावे, सामाजिक बदल घडावेत, यातून तरुणांना एक व्यासपीठ मिळावे, यासाठी धारावीतील महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये ‘मेकिंग मुंबई’ या युवा संमेलनाचे आज आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
युथ फॉर युनिटी अॅण्ड व्हॉलंटरी अँक्शन (वाययूव्हीए)च्यावतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाची सुरुवात सकाळी “मुंबई – शेर सब का”या संकल्पनेवर आधारित चर्चासत्राने झाली. दुपारी कार्यशाळा आणि सर्जनशील सत्रे झाली. कॉम्प्लेक्स सिटीच्या कलाकार सल्लागार दिव्या भाटिया यांनी ‘बातों में’ ही एकांकिका सादर केली. रॉयल सेंट्रल स्कूल ऑफ स्पीच अँड ड्रामा(यूके) आणि स्टेजलेफ्ट (इंडिया) यांनी एकांकिकासाठी मदत केली. या एकांकिकामध्ये शहरातील विखुरलेले जीवनाचे तुकडे आणि विशेषत: तरुण, प्रौढांचे चित्रण केले गेले. कार्यक्रमात वायूव्हीएच्या कार्यकारी संचालक रोशनी नुगेहल्ली यांनी विचार मांडले.




























































