मालाडच्या मनोरी बीचवरही ‘एलईडी’चा झगमगाट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जुहू आणि गोराई बीचनंतर आता मालाडचा मनोरी बीचही ‘एलईडी’ लाइटने झगमगून जाणार आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याची शोभा आणि पर्यटकांची सुरक्षाही वाढणार आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील अंधाराचा फायदा समाजकंटक घेत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व समुद्रकिनाऱ्यावर ‘एईडी’ लाइट लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनावडून घेण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चौपाटीसाठी सुमारे ५० ते ७० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर रंगीबेरंगी एलईडी लायटिंगही करण्यात आली आहे. चौपाटय़ांवरील लायटिंगमुळे सुरक्षाही वाढणार असून दुर्घटना आणि गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.