मलाला युसूफजाईवर बायोपिक 31 जानेवारीला

382

तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लढणारी मलाला युसूफजाई हिच्यावर ‘गुल मकई’ नावाचा बायोपिक येतोय. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळविणाऱया मलालावरील हा चित्रपट येत्या 31 जानेवारीला प्रदर्शित होतोय. एच. ई. अजमद खान यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची निर्मिती संजय सिंगला यांनी केली आहे. मलालाची केंद्रीय भूमिका अभिनेत्री रीम शेख साकारणार असून तिच्यासोबत अन्य भूमिकांमध्ये दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, पंकज त्रिपाठी, आणि मुकेश ऋषी हेदेखील दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या