
2008 मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आली. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची तब्बल 17 वर्षानंतर सुटका झाली. या निकालानंतर समीर कुलकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधक ठरली आहे. त्यांनी आपले 900 रुपये परत मागितले आहेत.
भोपाळ येथे राहणारे समील कुलकर्णी हे छपाई कामगार होते. मालेगाव बॉम्बस्फोटासाठी त्यांनी केमिकलचा पुरवठा केल्याचे तसेच बॉम्बस्फोटासाठी नाशिक आणि इंदूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र या सर्व आरोपांची आता समीर कुलकर्णी यांची सुटका झाली. त्यानंतर कुलकर्णी यांनी न्यायालयातच एक मागणी केली.
‘मला भोपाळमधून अटक करताना माझ्याकडून 900 रुपये काढून घेण्यात आले होतो. मात्र रेकॉर्डवर 750 रुपये दाखवण्यात आले. प्रश्न पैशांचा नाही, पण त्यावेळी माझ्याकडून घेतलेले 900 रुपये मला परत हवे आहेत’, अशी मागणी न्यायालयासमोर केली. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मौल्यवान वस्तू परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला नाही, असे न्यायालयाने म्हटले. मात्र समीर कुलकर्णी आपल्या मागणीवर ठाम राहिले.
17 वर्षानंतर सुटका
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या घटनेत 6 ठार तर 100 हून अधिक जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए), आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या 17 वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आता या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने आज सुनावला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
संघाचा संबंध नाही; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया