टीशर्ट काढून दाखव, 65 वर्षीय दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडे धक्कादायक मागणी

7729

मीटू चळवळ सुरू झाली आणि अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांना वाचा फोडली. हे वादळ सध्या शमलेले असताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा भयंकर प्रकार शेअर केला आहे. मल्हार राठोड असे त्या अभिनेत्रीचे नाव असून हॉटस्टारवरील हॉस्टेजेस या वेबसिरीजमध्येही काम केले आहे.

malhar-rathod-new-1

‘काही वर्षांपूर्वी मी एक ऑडिशन द्यायला गेली होती. त्यावेळी मी इंडस्ट्रीत नवखी होते. तिथे एक 65 वर्षीय दिग्दर्शक बसला होता. त्याने मला टॉप काढून दाखव असे सांगितले. काही काळ मला काही समजले नाही. मी घाबरले होते. मात्र नंतर मी तिथून निघून गेले’, असे मल्हारने स्वत: एका मुलाखतीत सांगितले आहे.

याआधी विद्या बालन, सुरवीन चावला, कंगना रनौत, तनुश्री दत्ता, संध्या मृदूल यांनी #MeToo च्या माध्यमातून त्यांच्यासोबत घडलेले कास्टिंग काऊच व लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडली होती. मल्हारने आरोप केलेल्या दिग्दर्शकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या