पुणेकरांसाठी खुशखबर; लवकरच मॉल, हॉटेल्स, लॉज सुरू होणार

1039

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात बुधवारपासून काही सार्वजनिक ठिकाणे सुरू होणार आहेत. कन्टेनमेंट झोन वगळता इतर भागात हॉटेल्स, मॉल्स, लॉज, व्यापारी संकुले अटी शर्तींसह सुरू होणार आहेत. पालिकेन यासाठी सूचना जारी केली आहे.

पालिकेने दिलेल्या सूचनेनुसार कंटनमेंट झोन वगळता इतर भागात हॉटेल्स, मॉल्स, लॉज, व्यापारी संकुले सुरू होणार आहेत.

पालिकेने जारी केलेले नियम

  • मॉल, हॉटेल सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे
  • येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीन होणे अनिवार्य
  • ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी
  • आर्थिक व्यवहरांसाठी ऑनलाईन पर्यायाला प्राधान्य द्यावे
  • कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांना प्रवेश नाही
  • प्रत्येक नागरिकाने आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक
  • हॉटेल व्यावसायिकांनी होम डिलीव्हरीला जास्त प्राधान्य द्यावे
  • लहान मुलांची खेळाची जागा, स्विमिंग पूल बंद राहणार
  • हॉटेल, मॉल, लॉज मालकांनी आपल्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे
  • लिफ्ट वापरणार्‍यांची संख्या मर्यादीत ठेवावी
आपली प्रतिक्रिया द्या