
आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सवाल उपस्थित केला की, मोदीजी शिव्यांचा हिशेब ठेवतात, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर का गप्प आहेत?
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. हिंदुस्थनी सैन्याने जोरदार हल्ला केला, पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असं तुम्ही म्हणता. पण अचानक युद्धविरामाची घोषणा झाली. ही घोषणा कोणी केली? कुठून झाली? ही घोषणा आपल्या पंतप्रधानांनी, परराष्ट्रमंत्र्यांनी किंवा संरक्षणमंत्र्यांनी केली नाही.”
खरगे यांनी पुढे म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधून युद्धविरामाची घोषणा केली आणि दावा केला की, मी युद्ध थांबवलं. पण मोदीजी हे मानायला तयार नाहीत. ट्रम्प यांनी तब्बल 29 वेळा हा दावा केला आहे.”
राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हणाले की, “मोदीजी शिव्यांचा हिशेब ठेवतात, पण ट्रम्प हिंदुस्थानविरुद्ध बोलतात तेव्हा ते का गप्प बसतात? ट्रम्प म्हणाले की, पाच हिंदुस्थानी जेट्स पाडली गेली. तुमच्या मित्राचं म्हणणं आहे, ज्याच्या प्रचारासाठी तुम्ही परदेशात जाता. परदेशात जाऊन कोणी प्रचार करतं का? आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने असं केलं नाही. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे. मोदीजींनी स्पष्टपणे सांगावं की आपलं एकही जेट पडलं नाही.”




























































