देवली वाघवणे येथे कांदळवन तोड, ग्रामस्थांच्या वतीने कांदळवन विभागाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवण तालुक्यातील देवली वाघावणे येथे कर्ली खाडी किनारी कर्ली ब्रिज पासून काही अंतरावर कांदळन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली आहे. दरम्यान, ही बाब लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ विरेश मांजरेकर यांनी याबाबत कांदळवन विभाग यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. तर तहसीलदार यांचेही याबाबत लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती त्यांनी बुधवारी दिली.

कांदळवन झाडांची तोड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. असे असताना कोणा अज्ञातांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. तरी यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी विरेश मांजरेकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान याप्रश्नी प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.