देवी शांतादुर्गा मातेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

अवघ्या मालवणी मुलुखाची अधिष्ठात्री आदिशक्ती आदिमाया वडाचापाट निवासीनी आई शांतादुर्गा मातेचा जत्रौत्सव गेले चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह सुरू आहेत. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत असलेल्या यात्रोत्सवाची आज सांगता होणार आहे.

जत्रौत्सवात श्री देवी शांतादुर्गा मंदिरात दुर्गासप्तशती महायज्ञ नुकताच संपन्न झाला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या महायज्ञयाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.

जत्रौत्सवाचे औचित्य साधून वडाचापाट ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी यावर्षि श्री शांतादुर्गावडाचापाट हि वेबसाईट ओपन केली आहे. यावेबसाईटच्या माध्यमाने भाविकांना मंदिरात होणाऱ्या वार्षिक उत्सवाची माहिती व होणारे वेगवेगळे उपक्रम पुढील येणारी जत्रौत्सवाची तारीख समजणार आहे. गावातील नवतरून युवक देवीभक्त भूपेश देवानंद पालव याने सुरू केली आहे.