मालवण कुडाळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार

584

मालवण कुडाळ मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. आमदार वैभव नाईक जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला.

आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी मालवण शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने घरोघर प्रचारावर भर दिला जात आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, प्रचार प्रमुख महेंद्र म्हाडगुत व महिला आघाडी उपजिल्हा संघटनक सेजल परब, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.

शहरातील प्रत्येक प्रभाग व वार्ड तसेच तालुक्यातील ग्रामीण भाग पंचायत समिती जिल्हापरिषद मतदारसंघात गाव तसेच वाडी वस्तीवर प्रचार फेरी, घरोघर प्रचार सुरू आहे.

शिवसेना युती शासनाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात झालेला विकास. घरोघर मिळणार प्रतिसाद पाहता तालुक्यातून मोठे मताधिक्य आमदार वैभव नाईक यांना मिळेल. असा ठाम विश्वास प्रत्येक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या