बालविवाह प्रकरणी पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बालविवाह प्रकरणी मालवणी पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या गुह्यात पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी ही मालाड परिसरात राहते. गेल्या वर्षी तिचा उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱया एकाशी विवाह झाला होता. मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील तिचा विवाह केला गेला होता. ती गर्भवती असल्याचे समोर आले. याची माहिती मालवणी पोलिसाना समजली. पोलिसांनी तिची विचारपूस केली. मुलीची विचारपूस केल्यास हा प्रकार समोर आला. मुलीने दिलेल्या पती, सासू आणि सासऱयाविरोधात तक्रार दिली. त्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पतीला अटक केली.