निकाल लागला तरी भाजपा हार मानायला तयार नाही! ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, निकाल लागला तरीही भाजप आणि त्यांचे केंद्रीय मंत्री हार मानायला तयार नसल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधरण आज पश्चिम बंगालच्या दौऱयावर असताना सकाळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर बोलताना भाजपा जनादेश मानायला तयार नाही. त्यामुळेच ते येथील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्यासाठीच केंद्रीय मंत्री आणि गृहमंत्रालयाची टीम वारंवार दौरे करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन सरकार येऊन 24 तास झालेले नाहीत, तोपर्यंतच ते पत्र पाठवून अहवाल मागवत आहेत. त्यांना पराभव पोचलेला नाही, तरीही त्यांनी जनतेने दिलेला काwल मान्य करावा असे ममता यांनी म्हटले आहे.

मंत्र्यांना निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागणार

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री कोणतेही ठोस कारण नसताना वारंवार पश्चिम बंगालचा दौरा करत असल्यानेच येथे कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे यापुढे राज्याबाहेरून कोणी मंत्री किंवा नेता येणार असेल तर त्याला अरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणणे बंधनकारक करण्यात येईल. असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.