बहिणीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्याला अटक

बहिणीशी प्रेमसंबंध ठेवू नको असे सांगूनही ऐकत नसल्याने भावाने कट रचून बहिणीचा प्रियकर अरमान शहा याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-5 ने आरोपी साहिल शर्मा याला अटक केली. बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको असे साहिलने अरमानला समजावले होते, पण तरी अरमान ऐकत नव्हता. त्याने प्रेमसंबंध सुरूच ठेवले. यामुळे साहिलची सटकली आणि त्याने अखेर बुधवारी संधी साधत अरमानला कायमचे संपवले.