केईएममध्ये रुग्ण व नातेवाईकांचे मोबाईल चोरणारा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केईएम इस्पितळात रुग्ण व नातेवाईकांचे मोबाईल तसेच किमती ऐवज चोरणाऱया एका सराईत चोराच्या भोईवाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक आरोपीकडून चोरीचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

केईएममध्ये एका डॉक्टरचा मोबाईल चोरीला गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय ठापूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन बोरसे, अनिल बोंग तसेच चव्हाण, धंगेकर, माळी, खेडेकर, पाटील व पथकाने तपास सुरू केला. पथकाने इस्पितळ परिसरातील 50 ते 60 सीसीटीव्ही फुटेज तपासून खबऱयांमार्फत माहिती काढली असता मोबाईल चोरणारा सराईत आरोपी फिरोज शेख (40) हा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान आठवडय़ाच्या विशिष्ट दिवशी फिरोज मध्यरात्रीच्या वेळेस चोरी करायला केईएममध्ये येतो असे समजताच पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.