
सध्याच्या घडीला लग्न म्हणजे फक्त लाखोंचा खर्च आणि गाजावाजा करून केलेले विधी आहेत. लग्न होताच वर्षभरात किंवा अवघ्या काही महिन्यातच घटस्फोट होतात. आणि मग हवी तेवढी पोडगी उकळली जाते. या गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. मात्र यामुळे कुटुंबावर अनेक परिणाम होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये एक तरूण त्याचा घटस्पोट अगदी आनंदात साजरा करतोय. त्यामुळे सोशल मीडियावर काहींनी त्याला ट्रोल केलयं, तर काहींनी त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान हा व्हिडीओ, बिरादर डी के नावाच्या एका तरूणाने 25 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत त्याने Happy Divorced असं कॅप्शन दिले आहे. या डिवोर्समुळे तो तरूणाचं नव्हे तर त्याच्या कुटुंबातील सदस्यही खूप आनंदी असल्य़ाचे दिसत आहे. त्या व्यक्तीच्या आईने आपल्या मुलाचा दुधाने अभिषेक केला आहे. यासोबतच happy divorce असं लिहिलेला एक केकही कापला आहे.
View this post on Instagram
बिरादरने शेअर केलेल्या केकवर 120 ग्रॅम सोन आणि 18 लाख रोख रक्कम असंही लिहिलं आहे. तो म्हणाला की, कृपया आनंदी राहा आणि स्वत:चा आनंद साजरा करा. उदास होऊ नका. 120 ग्रॅम सोने और 18 लाख रोख रक्कम घेतली नाहीए, तर दिलीए. सिंगल आहे, खुश आहे, आझाद आहे. हे माझं जीवन आहे आणि इथे माझेच निर्णय चालणार, असं कॅप्शन त्याने दिलय.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. घटस्फोटानंतर काहींनी त्याच्या आत्मविश्वासाचे आणि सकारात्मकतेचे कौतुक केले, तर काहींनी त्याने साजरा करण्याच्या निवडलेल्या पद्धतीवर टीका केली.