येरोळ येथे विहीरीत बुडून तरुणाचा मृत्यु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिरुर अनंतपाळ

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे गुरुवारी विहिरीत बुडून एका तरुणाचा मृत्यु झाला आहे. नरसिंग तात्याराव कांबळे (35 ) असे त्याचे नाव आहे.
नरसिंग येरोळ येथील खंडेराव ज्ञानोबा झांबरे यांच्या विहीरीवर सकाळी पाणी आणण्यासाठी गेला होता. पण विहीरीतून दोराच्या साहाय्याने पाणी काढत असताना त्याचा तोल गेला व तो विहीरीत पडला. पण पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान ,याप्रकरणी अकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.