VIDEO : माणूस की हैवान? दारूच्या नशेत जिवंत कोंबडी कराकरा चावून खाल्ली

260

सामना ऑनलाईन । मेहबूबाबाद

दारू अथवा अन्य मादक पदार्थांचे सेवन मनुष्याला हैवान बनवते याचा दाखलाच तेलंगणात पाहायला मिळाला आहे. तेलंगणातील मेहबूबाबाद शहरात दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या एका युवकाने जिवंत कोंबडी दाताने फाडून कराकरा चावून खाल्ल्याची घटना समोर आली आहे. हा प्रसंग पाहणाऱ्या एका वाटसरूने आपल्या मोबाईलमध्ये ही अमानवी कृती चित्रित करून तो व्हिडीओ सोशल साईट्सवर टाकला आहे.

मेहबूबाबाद जिल्ह्यातील केसमुद्रम भागात दोन युवक शुद्ध हरपेपर्यंत दारू प्यायले. त्यांनी नशेतच चिकन करी बनविण्यासाठी बाजारातून कोंबडी विकत घेतली. त्यातील एक जण रस्त्यातच झिंगून पडला. तर दुसऱ्याने अंगावर शहरे येतील असा प्रकार झिंगलेल्या अवस्थेत केला. त्याने भर रस्त्यातच हातातील जीवंत कोंबडी दाताने फाडली आणि ती कच्चीच अर्धी खाल्ली. नशेत आपण काय करतोय याचे जराही भान या मद्यधुंद युवकाला नव्हते. हा प्रसंग पाहणाऱ्या एका वाटसरूने आपल्या मोबाईलमध्ये या विकृत प्रसंगाचे चित्रीकरण करीत तो सोशल साईट्सवर टाकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या