‘या देशात फक्त हिंदूंचीच चालेल’ म्हणत शाहीन बागमध्ये तरुणाचा गोळीबार

491

जामिया नगर येथे नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) विरोधात निदर्शने करणाऱया आंदोलकांवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज शाहीन बाग येथेही एका व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली. शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावरच कपिल गुर्जर या तरुणाने हवेत गोळीबार केला.

‘या देशात फक्त हिंदूंचीच चालेल, इतर कुणाचीही नाही’, असेही तो बोलत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कपिल हा नवी दिल्लीच्या नोएडा सीमेवरील दल्लूपुरा भागात राहणारा आहे. त्याने हवेमध्ये दोन-तीन गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय बिस्वाल यांनी दिली. कपिल याला पोलीस पकडून घेऊन जात असताना तो ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता. गोळीबार केल्याचे कारण कपिलला विचारले असता त्याने ‘आमचा देश हिंदू राष्ट्रवादी आहे. या देशात मी असे होऊ देणार नाही’ असे त्याने आंदोलकांकडे पाहून सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या