दारू पिऊन घरी आलेल्या मुलाची वडिलांनी केली हत्या

1171

कौटुंबिक वादातून पित्याने मुलाची हत्या केल्याची घटना पवई परिसरात घडली. हरीश गुलाब गलांडे असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी गुलाब गलांडेला पवई पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हरीश हा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात काम करत होता. तो पवई येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. सोमवारी रात्री हरीश हा दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याने गुलाब यांच्यासोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर गुलाब यांनी रागाच्या भरात हरीशच्या डोक्यात कोयता मारला. त्यात हरीश गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पवई पोलिसांना कळवली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले व जखमी हरीशला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पवई पोलिसांनी गुलाबविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या