तीन मुलांचा गळा घोटून वडिलांची आत्महत्या, नालासोपाऱ्यात खळबळजनक घटना

प्रातिनिधिक फोटो

तीन मुलांचा गळा घोटून त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कैलाश परमार (40) असं या माणसाचं नाव आहे. त्याने शनिवारी रात्री नयन परमार (10), नंदिनी परमार (8) आणि नयना परमार (5) या त्याच्या तीन मुलांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली. या प्रकरणी कैलाशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक तणाव आणि पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयाने कैलाशने इतकं टोकाचं पाऊल उचललं असावं.

गेला बराच काळ कैलाश बेरोजगार होता. त्याची पत्नीच घर चालवत होती. कोरोनामुळे ती देखील काही काळ घरीच होती. त्यानंतर साधारण दीड महिन्यापूर्वी ती तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर कैलाशने तिचे आणि एका दुसऱ्या माणसाचे फोटो फेसबुकवर पाहिले होते. त्यानंतर त्याने मुलांची हत्या करून आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचे तपशील जाणून घेण्यासाठी तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या