माणूस आणि बिबटय़ांच्या संघर्षाच्या अभ्यासासाठी अकरा तज्ञांची समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवी वस्तीत बिबटय़ांचा संचार सुरु झाल्यानंतर मागील काही कर्षांमध्ये  माणूस व बिबटय़ांच्या संघर्षात वाढ झाली आहे.  त्याचबरोबर बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी अकरा जणांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी आज दिली. राज्यात मानव व बिबटे यांच्या संघर्षात मोठी वाढ झाल्याने तांत्रिक अभ्यास समिती नेमावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानंतर ही नेमण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिन्यात अहवाल सादर करतील. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मानव व बिबटय़ांचा संघर्ष कमी करण्याबरोबरच बिबटय़ांच्या मृत्यूची कारणे व इतर उपाययोजनांचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येईल.