मुलीचा हात धरुन I Love You म्हणणं पडलं महागात, तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा

एका तरुणाने एका मुलीचा हात धरला आणि प्रेमाची मागणी घातली. या प्रकरणी कोर्टाने तरुणाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईत एक 19 वर्षांचा तरुण आणि 14 वर्षांची मुलगी एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. मुलगी जेव्हा घराबाहेर आली तेव्हा या तरुणाने तिचा हात धरला आणि तिला I Love You म्हटलं. तेव्हा मुलगी घाबरली आणि आईकडे गेली. आईकडे जाऊन तिने तक्रार केली. तेव्हा आईने पोलिसांत धाव घेतली आणि तरुणाविरोधत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करत तरुणाला अटक केली.

पण तरुणाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्या मुलीनेच आपल्याला भेटायला बोलावले होते असा दावा या तरुणाने केला होता. तसेच पीडित मुलीचे आणि आपले प्रेमसंबंध असल्याचा दावाही या तरुणाने केला होता. पण जर दोघांचे प्रेमसंबंध असते तर त्या मुलीने आईकडे तक्रार केली नसते असे कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी कोर्टाने आरोपी तरुणाला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.