
हॉटेल व्यवस्थापनानेच कटकारस्थान करून हॉटेल मालकाला जादा खर्च करण्यास भाग पाडले. त्यानंतर लॉकडाऊनच्या कालावधीत हॉटेलची ऑनलाईन बुकिंग प्रणाली बंद करत 16 कोटी 58 लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर, इंटरनॅशनल हेड, एरिया जनरल मॅनेजर यांच्याविरूद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनिवास हरीहरन (वय 49, रा. गोरेगाव इस्ट, मुंबई ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीनिवास प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत पर्सनल अस्टिटंट पदावर कार्यरत आहेत. संबंधित कंपनीच्या मालकीचे बंडगार्डन रस्त्यावर हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या हॉटेल्स ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमीटेचे मॅनेजर आणि इतरांनी कटकारस्थान रचून तक्रारदारांच्या मालकाला फसविले.
शासनाचा कर न जमा करता, हॉटेलची ऑनलाईन बुकिंग प्रणाली जून 2020 मध्ये बंद केली. त्यानंतर तक्रारदारांना हॉटेलमध्ये 20 कोटी रूपयांचा खर्च करण्यास भाग पाडले. हॉटेलचे एकूण 16 कोटी 58 लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे तपास करीत आहेत.




























































