मंदा म्हात्रे यांचे गणेश नाईकांना आव्हान, हिंमत असेल तर समोर लढा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमच्यात तुमच्यात जर हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका, असे आव्हान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. बेलापूर येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा भूखंड रद्द करण्यासाठी महासभेच्या पटलावर ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत.

सीबीडी बेलापूरमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर सिडकोने हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केला. विकास आराखड्यानुसार ही जागा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी राखीव असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तरीही या रुग्णालयाला फोर्टी प्लस क्रिकेटच्या नावाखाली विरोध केला जात आहे, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे