औषधे – लसींवर आता क्यूआर कोड बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व लसी, प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स), कर्करोगावरील औषधे आणि सायकोट्रोपिक औषधांवर आता बारकोड किंवा क्यूआर (QR) कोड लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्यावर औषधाची सत्यता तपासता येणार आहे.