विठ्ठल चरणी आंब्यांची आरास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पंढरपूर

लाडक्या विठूमाऊलीला आंब्यांची आरास करण्यात आली होती या रसरशीत आंब्यांमुळे संपूर्ण श्री विठ्ठल मंदिरात घमघमाट पसरला होता. पुणे येथील श्री विठ्ठलभक्त विनायक काची या आंबा व्यापाऱ्याकडून 11हजार आंबे नैवेद्य म्हणून विठोबास दाखविण्यात आले. सदरची आरास करण्यासाठी तब्बल 100 हून अधिक भक्तांनी शुक्रवारी परिश्रम घेतले . रत्नागिरीहून आणलेले हे हापूस आंबे पुढील चार दिवस विठोबाच्या अन्नछत्रात आमरस रूपाने उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास होत असे, मात्र यंदा प्रथमच आंब्यांची आरास करण्यात आली आहे. पुणे येथील दगडूशेठ गणपती, मुंबईचा सिद्धिविनायक गणपती आदी देवस्थानांमध्ये अशी आरास करण्याचा प्रघात आहे.