नेपाळमधील हिंसाचारावर मनीषा कोईरालाची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नेपाळ सध्या हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. यामागील कारण सोशल मीडिया आहे. प्रत्यक्षात नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ, Gen-Z म्हणजेच १८ ते २८ वयोगटातील तरुण रस्त्यावर उतरले. यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली आहे. यावरच आधारीत बॉलिवूडमधील अभिनेत्री मनीषा कोइरालाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री मनीषा कोइरालाने तिच्या इंस्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या बुटाचा भावनिक फोटो शेअर केला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या या संकटावर एक तीव्र संदेशही दिला. अभिनेत्रीने नेपाळी भाषेत लिहिले, ‘आजको दिन नेपाल का लागी कालो दिन हो – जब जनताको आवाज, भ्रष्टचारवृध्दको आक्रोश रा न्यायको मगलाई गोलीले जवाफ दियो. म्हणजेच आज नेपाळसाठी काळा दिवस आहे – जेव्हा लोकांच्या आवाजाला, भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागाला आणि न्यायाच्या मागणीला गोळ्यांनी उत्तर दिले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

मनीषा कोईरालाचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला होता. अभिनेत्रीचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत आणि वडील प्रकाश कॅबिनेट मंत्री होते. १९८९ मध्ये मनीषाने ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मनीषाने सुभाष घई यांच्या सौदागर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यासोबतच, मनीषा वेश्याव्यवसाय आणि नेपाळी मुलींची तस्करी रोखण्यासाठीही काम करत आहे.

नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर (एक्स) यासह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. नेपाळच्या कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांनी देशात स्वतःची नोंदणी केलेली नसल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान ओली यांच्या सरकारने याला राष्ट्रीय सुरक्षा आणि नियमनाचा विषय म्हटले आहे.