
मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार असून लगेचच निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 18 उमेदवार रिंगणात असून शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे निवडणूक लढवीत आहेत.
पालिकेच्या 2017 ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 141 मधून काँग्रेसच्या तिकिटावर विठ्ठल लोकरे निवडून आले होते. तीन महिन्यांपूर्वी लोकरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जात आहे. या निवडणुकीसाठी 25 उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, कॉंग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम उद्दीन आणि समाजकादीचे खान जमिर भोले निवडणूक लढवीत आहेत. यामध्ये 11 अपक्ष उमेदकार निकडणूक रिंगणात आहेत.
या कार्डात 18 हजार 54 पुरुष मतदार आणि 14 हजार 32 महिला मतदार असे एकूण 32 हजार 96 मतदारांची संख्या आहे. निवडणुकीसाठी 28 बूथ असणार आहेत. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. तर 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत लल्लूभाई कंपाउंड येथील देवनार कॉलनी उर्दू प्राथमिक मनपा शाळा या शाळेत तळमजल्याकर बूथ क्र. 17 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 623 महिला मतदार असल्याने या महिलांचे मतदान जास्तीत जास्त प्रमाणात व्हाके यासाठी ‘पिंक मतदान केंद्र’ बनविण्यात आले आहे. या मतदान केंद्रात मतदान करणाऱया पहिला 5 महिला मतदारांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱयाकडून देण्यात आली.






























































