
सामना प्रतिनिधी। मनमाड
सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडून एस.टी. महांडळाच्या बसचा वापर करण्यात आला. मनमाड बस आगारातील 38 बस निवडणूक कामासाठी बुकिंग केल्यामुळे बस आगाराच्या विविध फेऱयांवर मोठा परिणाम झाला. शहरासह ग्रामीण भागातील अनेक बस फेऱया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा अडचणीचा सामना करावा लागला.
परिवहन महांडळाच्या बस निवडणूक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱयांना पोहचण्यासाठी व दुसऱया दिवशी परत घेऊन येण्यासाठी वापरल्या जातात. सोमवारी या कामासाठी 38 बस राखीव असल्यामुळे मनमाड आगाराचे रोजचे नियोजन कोलमडले. शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील अनेक फेऱया सोमवारी बंद होत्या. लांब पल्ल्याच्या बस सेवा रद्द करण्यात आल्या. पुणे, भुसावळ, शेगाव, सुरत यासह ग्रामीण भागातील अनेक बससेवा सोमवारी बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. सोमवारी लग्नाचे मुहूर्त मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांची संख्या दुपारनंतर वाढली होती. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेरगावाहून मनमाडला आलेल्या मतदानाचा गावाकडे येण्याचा ओघ मोठय़ा प्रमाणावर वाढला होता. मात्र आगारातील बससेवाच बंद असल्यामुळे दुपारनंतर मनमाड बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. मनमाड रेल्वे स्थानकातही आज तुरळक गर्दी दिसत होती. सोमवारी सार्वत्रिक निवडणूक मतदान, मतदानाची राष्ट्रीय सुट्टी यामुळे नागरिकांनी प्रवास करणे टाळले त्यामुळे रेल्वे तिकीट खिडकीवर तुरळक प्रवासी दिसून आले.































































