माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, जयपूर

माजी पंतपधान मनमोहन सिंग हे मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर जाणार आहेत. भाजपचे राज्यसभा सदस्य मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 26 ऑगस्टला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी मनमोहन सिंग मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिली आहे. मनमोहन सिंग हे यापूर्वी जवळपास तीन दशकांपासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत 21 जूनला संपली, त्यांना परत राज्यसभेत पाठवण्याएवढे संख्याबळ काँग्रेसकडे आसाममध्ये नसल्याने राजस्थानमधून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 200 संख्याबळ असणाऱ्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 100 आमदार असून 12 अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे.