88 वर्षांच्या डॉ. मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे माजी पंतप्रधान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर मात केली आहे. प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाल्यामुळे गुरुवारी सकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 19 एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी ’पॉझिटीव्ह’ आली होती. पुढील दहा दिवसांतच ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

88 वर्षीय डॉ. सिंग यांनी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेतले. त्यांनी याआधी ‘कोवॅक्सिन’ लसीचे दोन डोस घेतले आहेत. दहा दिवसांपूर्वी हलकासा ताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली होती. गेल्या वर्षीही औषधांचे रिअॅक्शन आणि ताप आल्यानंतर त्यांना ‘एम्स’मध्ये दाखल केले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. तसेच याआधी दोनवेळा बायपास सर्जरी झाली आहे.