मनोज चमणकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेल्या ‘द्विधाता’, ‘स्वामिनी’, ‘डॉक्टर..डॉक्टर’ आदी मालिकांचे निर्माते मनोज शांताराम चमणकर (56) याचे शुक्रवारी अल्प आजाराने निधन झाले.

दूरदर्शन निर्माते असताना अनेक मालिकांमध्ये त्यांनी आजच्या अनेक नामांकित कलाकारांना नवोदित म्हणून संधी दिली होती. सामाजिक भान जपताना त्यांनी निर्धार संस्थेची स्थापना करून अनेक समाजोपयोगी कामे केली. चमणकर यांच्या कार्याची दखल घेऊन सावंतवाडी संस्थानच्या राजमाता राणी पार्वतीदेवी वाचन संस्कृत पुरस्कार देऊन राजमाता सत्वशीलादेवी राणी यांनी त्यांना विशेष सन्मानित केले होते.

माजी आमदार व कृषिरत्न काकासाहेब चमणकर यांचे ते नातू होत. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.