मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना साताऱ्यात शांतता रॅलीदरम्यान संबोधित करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. साताऱ्यात शांतता रॅलीनंतर मनोज जरांगे मराठा बांधवांना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली व ते स्टेजवर बसले. त्यांचे हात थरथरत होते. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. अशक्तपणा असल्याने त्यांना चक्कर आल्याचं बोललं जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांची उद्या पुण्यात शांतता रॅली होणार आहे. मात्र आता रुग्णालयात दाखल केल्यामुळे ते या रॅलीला हजर राहणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान मनोज जरांगे हे फोनवरून मराठा बांधवांना संबोधित करणार असल्याचेही बोलले जात आहे.