दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा! मनोज जरांगे यांचे मराठा कार्यकर्त्यांना आवाहन

गोव्यातील ओबीसी अधिवेशनात एक मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे कारस्थान शिजले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्याचे म्होरके आहेत. राज्यात दंगली घडवण्याचा फडणविसांचा कट आहे. मात्र आमचे आंदोलन शांततेतच होणार आहे. परंतु जर अडवण्याचा प्रयत्न केलाच तर दिसेल त्या मागनि मुंबईत घुसा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा कार्यकत्यांना केले आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. बेमुदत चालणाऱ्या या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आज परभणीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. देवेंद्र फडणवीस यांनीच गोव्यात ओबीसींना गोळा केले. याच कार्यक्रमात मुंबईत होणारे मराठा आंदोलन उधळून लावण्याचा कट शिजल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

राज्यात जातीय दंगली घडवण्याचा फडणविसांचा विकृत मनसुबा आहे. मात्र आमचे आंदोलन थांबवण्याची ताकद कुणातही नाही. कुणी अडवण्याचा प्रयत्न केलाच, तर दिसेल त्या मागनि मुंबईत घुसा, असे आवाहन यावेळी जरांगे यांनी केले.

एकाही आंदोलकाला धक्का लागल्यास महाराष्ट्र कायमस्वरूपी बंद राहील, शिवाय त्याचा त्रास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

भाजपचे फुके म्हणाले शिंदे गटाचा बाप मीच! फडणवीसांची सारवासारव

परिणय फुके म्हणजे शेपूट धरलेला कुत्रा

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी काल मनोज जरांगे पाटील हे पावसाळी बेडूक असून निवडणूक आली की बाहेर निघतात, अशी टीका केली होती. त्यावर आज मनोज जरांगे यांनी जोरदार पलटवार केला. परिणय फुके म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेपूट धरलेला कुत्रा आहे. कुत्र्याचे शेपूट धरले की तो भुंकतो. आमदार फुके हे सध्या असेच भुंकत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे जरांगे महणाले.