
सामना ऑनलाईन । मुंबई
‘मनोरा’ आमदार निवास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर रिकामे करण्याचा निर्णय बुधवारी विधान भवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यावर मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी होईल.
ज्या आमदारांचे मनोरात वास्तव्य आहे त्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी आमदार निवास रिकामे करण्याचे आदेश विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिले होते. पण विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लक्षात घेऊन या अधिवेशनानंतर मनोरा आमदार निवास रिकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




























































