सरबज्योत सिंग- मनू भाकरने सरकारी नोकरीची ऑफर नाकारली, वाचा काय आहे कारण

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सरबज्योत सिंग आणि मनू भाकर या जोडीने हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवून दिले. या जोडीच्या चमकदार कामगिरीमुळे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची भेट घेतली. यावेळी दोघांनाही हरियाणा सरकारकडून नोकरीची ऑफर देण्यात आली. मात्र दोघांनीही ही ऑफर नाकारली असून त्याचे कारणही स्पष्ट केले आहे.

सरबज्योत सिंग आणि मनू भाकर यांनी ही ऑफर का नाकारली यावर आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया समन्वयक मुकेश वशिष्ठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्या म्हणण्यानुसार दोघंही नोकरीसाठी नाही तर सुवर्ण पदकांसाठी खेळत आहेत. त्या दोघांनाही क्रीडा विभागाच उपसंचालकपदाची ऑफर देण्यात आली होती. पण दोघांनीही ती नाकारली आहे.