
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली शहरात योग विद्याधामच्या वतीने गरजूंना मदत करण्यासाठी माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
घरातील वापरात नसलेले कपडे गरजूंना वाटण्यासाठी स्टेट बँकेसमोर योग विद्याधाम समितीने ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. दोन दिवस चालणार्या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणीकराव टाकळगव्हाणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना योगविद्याधामचे सुभाषचंद्र तापडीया यांनी माणुसकीची भिंत हा उपक्रम काळाची गरज असून, नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या अनावश्यक वस्तू या माणुसकीची भिंत उपक्रमात आणून द्याव्यात, तर ज्यांना काही वस्तू घेण्याची ऐपत नाही, त्यांनी या ठिकाणी भेट येऊन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू येथून कोणतेही शुल्क न देता घेऊन जाव्यात असे सांगत दोन दिवस हा उपक्रम चालवणार असुन या उपक्रमात व्यापार्यांनी आपली सर्जनशिलतेच्या अविष्कारातुन भरघोस नवीन कपडे दिल्याबद्दल आभार मानले.
दिवसभर या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. आज दिवसभरात शहरासह ग्रामीण भागातील दीड हजारच्यावर नागरिक, महिलांची मोठी गर्दी साहित्य घेवून जाण्यासाठी झाली होती. नगर पालिका कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी. पी. शिंदे यांच्यासह समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.






















































